२०१९ ची लोकसभा निवडणूक ही मोदी आणि शहा विरुद्ध : राज ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २०१९ ची लोकसभा निवडणूक ही केवळ मोदी आणि शहा विरुद्धची निवडणूक आहे. मोदी मुक्त भारत करणे हेच उद्देश आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आयोजित मेळाव्यात म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पासून मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत जाणार असल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीत या अशी मागणीही केली असल्याची चर्चा होती. याचदरम्यान अजित पवार आणि माझी भेट का झाली याबाबत राज ठाकरे यांनी खुलासा केला. त्यावेळी मला लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती आणि लढवणार नाही. मला अजित पवारांनी मागणी केली होती. त्यावेळेस पृथवीराज चव्हाण म्हणतात हे शक्य नाही. मी तुमच्या कडे आलो होतो का ? मी तुम्हाला जागेची मागणी केली होती का ? असे राज ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. माझा काही संबंध नाही. आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त मोदी आणि शहा विरुद्ध आहे. असेही त्यांनी म्हंटले. आणि यापुढे होणारी माझी संपूर्ण भाषणे ही फक्त मोदी आणि शहा विरुद्ध असणार आहे.

याचबरोबर, एअर स्ट्राईक संदर्भात धादांत खोटे बोलत आहे.  हे सरकार खोटे फोटो दाखून प्रचार करत आहे.