राजनाथ सिंहानी विचारलेल्या ‘या’ प्रश्नाला शेतकऱ्यांचे एकासुरात उत्तर ; ‘त्या’ उत्तरामुळे राजनाथ सिंहांची नाचक्की

पाटणा : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यात 2 हजार रुपये मिळाले का? असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विचारला असता उपस्थित शेतकऱ्यांनी एका सुरात नाही असे  उत्तर दिले. यामुळे राजनाथ सिंहांना नाचक्की सहन करावी लागली असे दिसून येते.
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालेले आहे, याचदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहं  प्रचारासाठी बिहार दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी,  त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. आयुष्यमान भारत, कृषी सन्मान योजनेबद्दल ते बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ६ हजारांच्या मदतीबद्दल राजनाथ सिंह बोलले. इतकेच नव्हे तर तुम्हाला आता २००० रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला का?  असा प्रश्नही त्यांनी विचारला त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात नाही असे उत्तर दिले.
त्यानंतर त्यांनी, कोणाच्या तरी खात्यात रक्कम झाली असेल ना? असा प्रश्न विचारला मात्र त्यावेळी एकाही शेतकऱ्याने प्रतिक्रिया दिली नाही. त्यावेळी आस कस होऊ शकते म्हणत कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत असे त्यांनी म्हंटले. परंतु त्यावेळेसही एकसुद्धा शेतकऱ्याने हात वर केला नाही. त्यावेळी, राजनाथ सिंह यांना नाचक्की सहन करावी लागली.