Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

नवी दिल्ली : Lok Sabha Election In Maharashtra | महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक 2024 ही तब्बल पाच टप्प्यात पार पडणार आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात रायगड (Raigad Lok Sabha), बारामती (Baramati Lok Sabha), धाराशिव (Dharashiv Lok Sabha), लातूर (Latur Lok Sabha), सोलापूर (Solapur Lok Sabha), माढा (Madha Lok Sabha), सांगली (Sangli Lok Sabha), सातारा (Satara Lok Sabha), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha), कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha), हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांचा समावेश असून, ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे.(Lok Sabha Election In Maharashtra)

महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचा निवडणूक कार्यक्रम

एकुण जागा – ११
अधिसूचना जारी होण्याचा दिनांक – १२ एप्रिल
उमेदवारी भरण्याचा अखेरचा दिवस – १९ एप्रिल
अर्जाची छाननी – २० एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – २२ एप्रिल
मतदानाचा दिवस ७ मे

महाराष्ट्रातील निवडणुकीचे ५ टप्पे आणि मतदार संघ

 • पहिला टप्पा – १९ एप्रिल २०२४
  रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर
 • दुसरा टप्पा – २६ एप्रिल २०२४
  बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी
 • तिसरा टप्पा – ७ मे
  रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
 • चौथा टप्पा – १३ मे
  नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड
 • पाचवा टप्पा – २० मे २०२४
  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण
 • मतमोजणी : ४ जून २०२४

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Land Acquisition for DP Road Widening | शिवाजीनगरमध्ये ‘या’ रस्त्यावरील ५२ मिळकती ताब्यात घेणार, रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत आदेश

Ganeshkhind Road Pune | गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन कायद्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे काम युद्धपातळीवर

Waste To Energy Plant (Wte) Ramtekdi Pune | रामटेकडी येथील पुणे बायो एनर्जी प्रकल्पात 5 वर्षात कचऱ्यापासून एक युनिट देखील वीज निर्मिती नाही; प्रकल्पात कचऱ्याचे ढीग साठल्याने आरोग्याचा ‘धोका’ वाढला