‘या’ काळात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा उद्या पार पडत असून त्यानंतर २३ तारखेची उत्सुकता सगळ्यांना लागणार आहे. सत्ताधारी भाजपसह विरोधक देखील आम्हीच सत्तेवर येणार असा दावा करत असल्याने या निवडणुकीत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानांच रस निर्माण झाला आहे.

याच विषयावर अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडियन एक्सप्रेसशी’ बोलताना भाष्य केले आहे. दिल्लीत आपला किती जागा मिळणार या प्रश्नावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले कि, आम्हाला सातही जागा निवडून येण्याची आशा आहे, मात्र निवडणुकीच्या २ दिवस अगोदर मुस्लिम मते काँग्रेसकडे वळण्याने त्याचा फटका आपला बसू शकतो आणि त्याचा परिणाम आमच्या जागेंवर निश्चितच होणार आहे. मुस्लिमांची संख्या हि १२ ते १३ टक्के असल्याने त्याचा प्रभाव नक्कीच मतदानावर पडणार आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत दणकून पराभव

दरम्यान २०१४ च्या मोदी लाटेत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. सातही जागेवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसनं त्यांना दाद दिली नाही.

भाजपच्या पराभवावर काय ?

भाजप पुन्हा सत्तेत येणार का?हा प्रश त्यांना विचारला असता ते म्हणाले कि, जर भाजपने ईव्हीएम घोटाळा केला नाही तर भाजपचे सत्तेवर येणे अवघड आहे. त्याचवेळी भाजप सोडून कुणीही सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितल्यास आपण त्यांना पाठिंबा देणार आहोत.

Loading...
You might also like