Lok Sabha Election – MCCIA | मतदार जागृतीसाठी ‘एमसीसीआयए’चा पुढाकार ! ‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Lok Sabha Election – MCCIA | मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरने Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture (MCCIA) मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला असून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी संस्थेतर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष मुकेश मल्होत्रा (Mukesh Malhotra) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी (Pune Collector) आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांची भेट घेऊन चेंबरकडून लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जनजागृतीसाठी घेण्यात येत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली.

पुणे शहरातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता शहरी भागात आणि विशेषत: औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कामगारांना मतदान करण्यासाठी संस्थेने प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी व्यक्त केली.

‘वोट कर पुणेकर’ मोहिमेद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून आणि औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्षात भेट घेवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मतदान टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे.

पुण्यातील नागरिकांना त्यांच्या नागरी हक्क आणि कर्तव्यांची सखोल जाणीव आहे.
पुणे हे नागरी सहभागाच्या संस्कृतीचे वेगळेपण जपते आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिक मतदान करून ही परंपरा
जोरकसपणे पुढे न्यायला हवी. त्यामुळे पुण्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी
मोहीम सुरू करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रात मतदार जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील मतदारांचा
मतदान प्रक्रियेत सहभाग वाढेल, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी – मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचा मतदार जागृती उपक्रम स्तुत्य
असून त्यामुळे उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांना मतदान करण्याची प्रेरणा मिळेल.
पुणे जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)