मोदींच्या ‘त्सुनामी’त दिग्विजय, शत्रुघ्न, कन्हैयासहित ‘या’ दिग्गजांचा ‘सुपडा साफ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या ५४२ जागांवर झालेल्या मतदानानंतर आता देशभरात मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीवरून यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची हार होताना दिसत आहे. जरी निकालाची ही शेवटची आकडेवारी नसली तरी अंतिम निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात भाजप कडून पराभूत होत असलेल्या काही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २०१४प्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील मोदी यांचीच जादू कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. मोदींच्या या त्सुनामी लाटेत दिग्गज नेत्यांचा पराभव होताना दिसत आहे.

१) मल्लिकार्जुन खर्गे (कांग्रेस)

कर्नाटकातील गुलबर्गा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आकडेवारीनुसार भाजपचे उमेश जाधव जवळपास १ लाख १० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

२) शत्रुघ्न सिन्हा (कांग्रेस)

पटना साहिब मतदार संघात भाजपकडून रविशंकर प्रसाद तर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपचे रविशंकर प्रसाद जवळपास दोन लाख मतांनी आघाडीवर आहेत.

३) कन्हैया कुमार (सीपीआई)

बिहार मधील बेगुसराय मतदार संघात सीपीआई कन्हैया कुमार तर भाजप कडून गिरिराज सिंह निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपचे गिरिराज सिंह मतांनी आघाडीवर आहेत.

४) ज्योतिरादित्य सिंधिया (कांग्रेस)

मध्य प्रदेश मधील गुना लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून ज्योतिरादित्य सिंधिया तर भाजपकडून केपी यादव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदार संघात भाजपच्या के पी यादव १ लाख २२ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

५) दिग्विजय सिंह (कांग्रेस)

ज्या मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते त्या भोपाळ मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या लढत आहे. या मतदार संघात भाजपच्या प्रज्ञा सिंह जवळपास २.५ लाख मतांनी आघाडीवर आहेत.