आंध्र प्रदेशचा ‘हा’ नवा ‘हिरो’ ; चंद्राबाबू आणि मोदी दोघेही ‘झिरो’ !

हैदराबाद : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. लोकसभेत देखील त्यांनी घवघवीत यश मिळवत चंद्राबाबूंचा धुव्वा उडवला.

वायएसआर रेड्डींचा वारसा

जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे पुत्र आहेत. २००९ मध्ये वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यानंतर जगनमोहन रेड्डी हेच त्यांचे राजकीय वारसदार बनले.

३ हजार किमीची पदयात्रा

जगनमोहन रेड्डी यांचा झंझावाती प्रचार पाहता यावेळी ते इथे यशस्वी होतील, असं बोललं जात होतं. यावेळी त्यांनी ४३० दिवसांची पदयात्रा काढून नागरिकांना आवाहन करत प्रजा संकल्प पदयात्रा काढली होती. १३ जिल्ह्यांमध्ये १२५ विधानसभा मतदारसंघात फिरले. ”रावळी जगन, कावळी जगन अशी त्यांची घोषणा होती. जगनमोहन निवडून आले पाहिजेत, आम्हाला जगनमोहन हवे आहेत, असा याचा अर्थ होतो.

विधानसभेत करिष्मा

या विधानसभेत त्यांनी आपला करिष्मा दाखवत १७६ पैकी १५१ जागांवर विजय मिळवत राज्यात सरकार स्थापन केले आहे. २०१४ साली देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात यासह मिळावेत ६६ जागा जिंकल्या होत्या.

त्यामुळे वायएसआर रे़ड्डी यांच्या निधनानंतर स्वतःचा पक्ष स्थापन करून त्यांनी १० वर्षातच सत्तेत येण्याची किमया साधली आहे. त्यांनी वडीलांच्या निधनानंतर २०१० मध्ये आपल्या पक्षाची स्थापना केली होती.