शेअर बाजाराचाही भाजपाला कौल ; इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ४०,०००

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची ही घोडदौड सुरूच आहे. स्थिर सरकार येण्याच्या चिन्हानंतर शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ४०,००० वर पोहचला आहे. आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला असून निफ्टीने १५० अंकाची उसळी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीचे कौल भाजपच्या बाजूने येऊ लागल्याने शेअर बाजार कमालीचा तेजीत आला आहे. सुरुवातीच्या १५ मिनिटातच शेअर बाजार ६०० अंकाने वधारला होता.

एक्झिट पोलचा अंदाज वर्तवल्यापासून आठवड्याची शेअर बाजाराची सूरूवात चांगली झाली होती. यापूर्वी २१ मे रोजी एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सेन्सेक्स ३९५७१ अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी २०० अंकांनी वाढून ११,९३० वर गेला होता. शेअर बाजाराने १० वर्षांतील विक्रमी उसळी घेतली होती.