#AirStrike : एअर स्ट्राईकबाबत अमित शहांचा मोठा खुलासा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा एका भाषणात सांगितला होता. त्यानंतर विरोधांनी अमित शहा यांना याच मुद्द्यावर घेरण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमित शहा आपले मौन सोडले आहे.

भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून २५० दहशतवादी ठार केल्याचे अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हणले होते. या वक्तव्यावर अमित शहा यांना घेरले गेल्यावर त्यांनी आपले मौन सोडले आहे. मी एका राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आहे. मी सरकारचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे मी लोकांमध्ये चर्चेत असणारा आकडा आणि माध्यमात चर्चेत असणारा आकडा सर्वांच्या समोर मांडला असे अमित शहा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे.

पाकिस्तानच्या संसदेत आणि मीडियात भारताने २० लढावू विमाने पाकिस्तानात पाठवली अशी चर्चा होती. त्यांच्या या खोट्या दाव्यावरून कळून येते कि पाकिस्तानला एअर स्ट्राईकचा किती धसका बसला आहे, याची कल्पना आपल्या सर्वांना येते असे अमित शहा या मुलाखतीत म्हणले आहेत.

दरम्यान अमित शहा यांनी याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश कसा सुरक्षित आहे याबद्दल देखील भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्याच प्रमाणे देशाच्या आर्थिक आणि सुरक्षेच्या क्षेत्रात देशाला मोदींच्या नेतृत्वात प्रगती केली आहे असे अमित शहा यांनी म्हणले आहे.