home page top 1

लोकसभा निवडणूकीत ६१० पक्षांना मिळाली नाही एक ही जागा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – २०१९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत केवल ६ पक्षांनीच मिळून ३७५ जागावर बाजी मारली. मागील लोकसभेच्या निवडणूकीत याच ६ पक्षांनी ३४२ जागा जिंकल्या होत्या. तर यंदाच्या लोकसभेत धक्कादायक बाब ही आहे की देशात ६१० पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. यात जास्त करून प्रादेशिक आणि छोट्या पक्षांचा समावेश आहे. तर यात अनेक असे पक्ष आहेत की त्यांना या निवडणूकीत ० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर ही धक्कादायक माहिती समोर येत आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जे आकडे समोर आले आहेत त्यात राजकीय पक्षांपैकी १३ असे पक्ष आहेत ज्यांना केवल १ जागा जिंकता आल्या आहेत.

या पक्षांचे लोकसभेत फक्त १ – १ खासदार –

आम आदमी पार्टी (संगरूर, पंजाब), नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक स्टूडेंट्स यूनियन पार्टी (गिरीडीह, झारखंड), एआईडीएमके (थेनी, तमिळनाडू), ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (धुबरी, आसाम) आणि रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (कोल्लम, केरल ) या पक्षाचे लोकसभेत फक्त एक एक खासदार पोहचू शकला आहे.

हे आहेत ते पक्ष जे १ जागा देखील जिंकू शकले नाहीत –

फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन नॅशनल लोकदल (INLD), जननायक जनता पार्टी (JJP), सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF), राष्ट्रीय लोक समता पार्टी, सर्व जनता पार्टी (SJPA), जम्मू और कश्मीर डेमोक्रेटिक पार्टी, ऑल इंडिया एनआर काँग्रेस (AINRC), राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि पीएमके, हे असे पक्ष आहेत की त्यांनी एकही जागा जिंकलेली नाही.

तब्बल ५३० पक्षांना मिळाले ० टक्के मतं –

यातील तब्बल ६१० असे पक्ष आहेत की त्यांना एकूण मिळून १ टक्क्यापेक्षा देखील कमी मते मिळाली आहेत तर ५३० पक्षांना तर ० टक्के मतदान झाले आहे. यावर्षी तमिळनाडूतील एका जागेसाठी निवडणूक लढवण्यात आली नाही. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर अनेक राज्यातील पक्षांची वाईट अवस्था झाली आहे.

Loading...
You might also like