पंतप्रधान मोदींच्या बायोपिकविषयी ‘ही’ अभिनेत्री भडकली ; म्हणाली….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदींवरील बायोपिक म्हणजे थट्टाच आहे असे म्हणत उत्तर मुंबईल लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मोदींच्या बायोपिकवर टीका केली आहे. मुंबईतमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

मोदींच्या बायोपिकवर टीका करताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदींना देशातील प्रश्नांवर बोलायला वेळ नाही. कारण ते परदेशात जाऊन बसतात. या पंतप्रधानांनी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्यांची दिशाभूल केली आहे. अशा पंतप्रधानांवर चित्रपट निर्मिती करणे म्हणजे हा थट्टेचा विषय आहे. भाजपाच्या अनेक योजना तोंडघशी पडल्या आहेत. त्या योजनांवर एखादा कॉमेडी शो सुरू केला तर तोसुद्धा खूप चालेल. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणारे विकास करण्यात अपयशी झाले आहेत. त्यांच्या जीवनावर बनणारा चित्रपट म्हणजे भारतीय लोकशाही आणि गरिबीची चेष्टा आहे.’

उर्मिला मातोंडकरकडून मराठीच्या मुद्द्याचे समर्थन –

उर्मिला मातोंडकर यांना मनसेने समर्थन दिले आहे. त्याविषयी आभार मानताना पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, ‘मी वयक्तिक पातळीवर मराठीच्या मुद्दयाचे समर्थन करते आणि यापुढेही करत राहील. माझा मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना पाठिंबा आहे. मी वयक्तिक पातळीवर राज ठाकरे यांचं समर्थन करते आणि त्यात काही चुकीचं नाही.’

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर यांना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान आहे. या जागेवर २९ एप्रिलला मतदान होणार आहे.