युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन ‘मातोश्री’वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर आधीच राग आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांची भर पडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला नाही. आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पूनम महाजन यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी कोणत्याही उमेदवाराला परवडणारी नसते. त्यातच युवासेनेचे कार्यकर्ते नाराज झाल्याने पूनम महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पूनम महाजन चूक मान्य करत नाहीत तोपर्य़ंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युवासैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी पुनम महाजन मातोश्रीवर गेल्या होत्या.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे बॅनर लावले होते, त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये युवासेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. “आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत, युवकांचे आशास्थान आहेत, त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. त्यामुळे पूनम महाजन यांनी आदित्य ठाकरेंना डावलल्याचा निषेध करत असल्याचं युवासेनेकडून सांगण्यात आलं.

Loading...
You might also like