‘त्यांनी’ माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं : भरसभेत जयाप्रदा रडल्या..

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री जयाप्रदा यांनी बुधवारी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर सभेत बोलताना त्यांनी सपा उमेदवार आजम खान यांच्यावर गंभीर आरोप केला. यांनी माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचे षडयंत्र रचले असे जयाप्रदा यांनी म्हटले. हे सांगत असताना त्या अत्यंत भावूक झाल्या.

यावेळी जयाप्रदा म्हणाल्या की, ”मला रामपूर कधीच सोडून जाण्याची इच्छा नव्हती. रामपूरमध्ये गरिब लोकांवर दबाव टाकण्याचं काम केलं जातं. त्यासाठी मला रामपूर सोडायचं नव्हतं. सपाचे उमेदवार आजम खान यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की, जे कोणी त्यांच्याविरोधात जातात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. मी रामपूर सोडलं, सक्रीय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेले. मला मारण्याचा प्रयत्न झाला” असा आरोप समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांच्यावर केला.

जयाप्रदा यांनी १९९४ साली एनटी रामाराव यांच्या तेलगुदेसम पार्टिमध्ये प्रवेश केला. यानंतर आंध्र प्रदेश राज्यातून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या. उत्तर प्रदेशाच्या राजकारणामध्ये येण्यासाठी त्यांनी समाजवादी पार्टित प्रवेश केला. त्यांनी २००४ आणि २००९ ची लोकसभा समाजवादी पक्षाच्या तिकिटीवर लढवली होती. यानंतर २०११ मध्ये समाजवादी पक्षाचे अमर सिंह यांच्या राष्ट्रीय लोकमंच पक्षात त्यांनी प्रवेश केला. २०१४ मध्ये आरएलडीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावर्षी त्यांचा निवडणूकीत पराभव झाला. पुन्हा त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावर्षी त्या भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहे.