विरोधी पक्षांनी ECवर टिकेची ‘झोड’ उठवल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून ECचे ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी लोकसभा २०१९ च्या निवडणुका चांगल्या पद्धतिने पार पडल्यामुळे निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे. तेसच कोणीही त्यांचा अपमान करू शकत नाही असे बजावले आहे. नवी दिल्ली येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी ते उपस्थित होते त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.

यावेळी बोलताना प्रणव मुखर्जी म्हणाले की, “आधीचे निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्यापासून आतापर्यंत असलेल्या आयुक्तांपर्यंत खूप चांगले काम केले आहे. पुढ़े त्यांनी सांगितले की, कार्यकारी तीन कमिशनर्स नेमतो. ते आपले कर्तव्य व्यवस्थित बजावत आहेत. असे मुखर्जीं यांनी सांगितले. ते पुढे म्हणले की ‘कोणीही त्यांचा अपमान करू शकत नाही. निवडणुकांचा दृष्टिकोण योग्यच आहे’. विरोधी पक्षांकडून वारंवार निवडणूक आयोगावर टीका केल्या जात आहेत त्यावरून प्रणव मुखर्जी यांनी भाष्य केले आहे.

मुखर्जीं यांनी एनडीटीवी च्या सोनिया सिंह यांच्या ‘डिफाइनिंग इंडिया: थ्रू देयर आइज’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलतांना भाष्य केले की, जर लोकशाही यशस्वी झाली असेल तर हे मुख्यतः सुकुमार सेन आणि विद्यमान निवडणूक आयुक्तांच्या चांगल्या रीतीने पार पडलेल्या निवडणुकांमुळेच आहे.” असे प्रणव मुखर्जी म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

एक्झिट पोल च्या अंदाजानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोप केला होता. त्यांनी आपल्या आधिकृत ट्विटवरून म्हंटले होते की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर निवडणूक आयोगाचे आत्मसमर्पण सर्वांसमोर जाहीर आहे. तसेच निवडणूक आयोग आता निष्पक्ष किंवा सन्मानित राहिले नाही’. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढल्यामुळे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.