Video : भाजप नेत्याने तोडले अकलेचे तारे ; प्रियंका गांधींना म्हंटले ‘पप्पू की …

सिकंदराबाद : वृत्तसंस्था – आगामी २०१९ लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. जागोजागी प्रचार सभा घेतल्या जात आहेत असे असताना विरोधी पक्षांवर टीका टिपण्णी राजकीय पक्षांकडून केल्या जात आहेत. मात्र भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने काँग्रेसवर टीका करताना थेट खालची पातळीच गाठली आहे. त्यांनी भरसभेत आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांना चक्क ‘पप्पू की पप्पी…’ म्हंटले त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त दिले आहे.

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी आपल्या सिकंदराबाद येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये विरोधी पक्षावर खालच्या पातळीची टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हंटले की “जर ममता बॅनर्जी यांनी येथे येऊन कथ्थक केले आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन गाणे म्हंटले तरी त्यांना कोण ऐकणार आहे ?. महेश शर्मा एवढ्यावरच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला ते म्हणाले की, ‘पप्पू (राहुल गांधी) म्हणतोय की मी प्रधानमंत्री होणार, आता तर पप्पू की पप्पी (प्रियंका गांधी) सुद्धा आली आहे. या सगळ्यांच्या वरती “आज हमारा शेर मोदी है” असे महेश शर्मा म्हणाले.

दरम्यान, महेश शर्मा यांनी यापुर्वी देखील वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा तो व्हडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता ‘ सबसे बड़े बेवकूफ हम और आप नहीं, बल्कि ऊपर वाला भगवान है, क्योंकि हम सब उसी के बच्चे हैं’ असे ते म्हणाले होते. त्यांनी नंतर त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले होते. आता देखील त्यांचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतो आहे. त्यांचा व्हिडीओ ट्रोल होतो आहे.