ममतांनी बदलला ‘फेसबूक’ आणि ‘ट्विटर’वरील डीपी ; डीपीमध्ये ‘या’ जेष्ठ समाजसुधारकांचा फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकात्यात झालेल्या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हिंसाचारात समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचा आरोप ममता बॅनर्जी करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थच त्यांनी फेसबूक आणि ट्विटरवरील डीपी बदलला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या घटनेच्या निषेधार्थ फेसबुक ट्विटरवरील डीपी बदलला आहे.

काल झालेल्या हिंसेसाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेस एकमेकांवर आरोप करत आहेत. भाजपने या हिसाचाराच्या घटनेची तक्रार निवणूक आयोगाकडे केली आहे.

ममता बॅनर्जी यांची अशाप्रकारे डीपी बदलणे ही पहिली वेळ नाही. याआधी देखील ममता बॅनर्जी यांनी निषेध नोंदविण्यासाठी डीपी बदलला आहे. आसाममध्ये तिनसुकिया येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ ममतांनी डीपी काळ्या रंगाचा ठेवला होता. तृणमूलच्या इतर नेत्यांनी देखील त्यांच अनुकरण केले होते.

अमित शहा यांच्या रोडशो मध्ये झाला होता हिंसाचार

रोडशो चालू असताना विद्यासागर कॉलेजमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्त्यांनी अमित शहा यांच्या रोडशोवर दगडफेक केली होती. यांमुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्त्यांमध्ये जोरदार मारहाण झाली. या घटनेमुळे ममता आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे द्वंद्व सुरु झाले.