मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यामागे शिवसेनाच ; २८ कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंची भागीदारी : नारायण राणे

रत्नागिरी : पोलिसनामा ऑनलाईन – रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली आहे त्याला शिवसेनाच जबाबदार आहे असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.

युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात ?

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस ६० टक्के होता तर आज मराठी माणूस १८ टक्के आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली

मागील निवडणुकीत भाजपासोबत शिवसेनेने निवडणूक लढवली आणि स्वत:चा फायदा करुन घेतला. सलग ५ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने शिवसेनेनी टीका केली. टीकेशिवाय काहीच केलं नाही. युतीत सडेपर्यंत कशाला राहिलात? अमित शहांना अफजल खान म्हटलं आणि परवा त्यांचाच फॉर्म भरायला गांधीनंगरला गेले. शिवसेनेची प्रवृत्ती विकृत आहे. उपकार घ्यायचे, सत्तेचा फायदा उचलायचा हे शिवसेनेचं दुटप्पी धोरण असल्याचं राणे यांनी सांगितले.

राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही

पाच वर्षात विनायक राऊतांनी केले काय? राऊतांनी १ कोटींचे काम तरी केले का ? असा सवाल करीत नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊतांना धड हिंदी बोलता येत नाही. एसएससीला दोनदा नापास झालेल्या माणसाला लोकसभेत पाठवलं ही लोकांची चूक आहे. नारायण राणेंना शिव्या घालायचा हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांना दिला आहे अशी टीका राणे यांनी विनायक राऊंतांवर केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like