शर्लिन चोपडाचा ‘तो’ BOLD VIDEO सोशलवर प्रचंड व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शर्लिन चोपडाचे बोल्ड आणि हॉट फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. तिचा अंदाज हा नेहमीच घायाळ करणारा असतो. सोशल मीडियावरही तिचा बोल्ड अवतार मोठ्या प्रमाणात पसंत केला जाताना दिसतो. सध्या तिचा एक बोल्ड असा घायाळ करणारा आणि चांगला संदेश देणारा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात शर्लिन चोपडा मतदान करण्याचा संदेश देत आहे. त्यात ती रॅप गाताना दिसत आहे. हा रॅप शर्लिनने स्वत: लिहिला आहे. पाच वर्षे झाली आता आपल्या विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा असा संदेश ती देत आहे. शिवाय काहीही झालं तरी मतदान करा असंही ती सांगत आहे.

मतदान करण्याचे आवाहन करणारा शर्लिन चोपडाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. संदेश देणारा जरी हा व्हिडीओ असला तरी मात्र यात शर्लिनचा बोल्ड अवतारही दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओकडे ती लक्ष खेचताना दिसत आहे. खास एक बोल्ड आणि हॉट अंदाजात शर्लिन मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. वोट डाल असे या गाण्याचे बोल आहेत.

शर्लिन चोपडाने हा व्हिडीओ तिच्या युट्युह चॅनेलवरून शेअर केला आहे. 24 एप्रिल रोजी हा व्हिडओ अपलोड करण्यात आला आहे. दिवसेंदिवस या व्हिडीओचे व्ह्युज वाढताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

You might also like