वडिलांचा प्रचार करणार का ? सोनाक्षी सिन्हा म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नुकताच एका मुलाखतीत आता सोनाक्षीला वडिलांसाठी निवडणुकीचा प्रचार करणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांचा प्रचार करणार नसल्याचे तिने सांगितले.

सोनाक्षी म्हणाली की, “माझा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा शत्रुघ्न सिन्हा माझ्यासाठी प्रमोशन करत नाहीत. तर मीदेखील त्यांचा का करावा ? शिवाय त्यांचीही तशीच इच्छा नाही.” असे सोनाक्षीने म्हटले आहे.

जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तेव्हा त्यावरही सोनाक्षीने आपली प्रतिक्रिया दिली होती. सोनाक्षी म्हणाली होती की, “भाजपामध्ये बाहेर पडल्यानंतर त्यांना आता काँग्रेसमध्ये अपमान सहन करावा लागणार नाही.” शिवाय कोणाच्याही दबावाखाली काम न करता ते उत्तम कामगिरी करतील असा विश्वासही सोनाक्षीने व्यक्त केला होती. दरम्यान राजकारणाबाबत बोलायचे झाले तर सोनाक्षी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते.

Loading...
You might also like