लोकसभा निवडणूक २०१९ : या दोन मोठ्या पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीचा सपा-बसपाचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला आहे, असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुजन समाज पार्टी 38 जागांवर तर समाजवादी पक्ष 37 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. मात्र आता कोणता पक्ष किती लोकसभा जगा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जागांबाबत फॉर्मुला ठरवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मायावती यांची बहुजन समाज पार्टी 38 जागांवर तर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष 37 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र अद्यापही उमेदवार निश्चित झालेले नाही.

https://twitter.com/ANINewsUP/status/1098524295897133059