पर्रिकरांच्या मुलाने पवारांचा बुरखा फाडला : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राफेलवरुन शरद पवार जे बोलले त्यावर मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने पत्र लिहून पवारांचा बुरखा फाडला. गेलेल्या व्यक्तींवर राजकारण तरी करू नका, अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधातही असच रान उठवल गेल आणि वाजपेयी सरकार पडल. परदेशी सरकार नको म्हणून सोनिया गांधींना विरोध शरद पवारांनी केला आणि निवडणुकीनंतर पुन्हा निर्लज्जासारखे सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावले, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे केला.

आम्हाला लाज वाटते का विचारण्याआधी स्वत:ला आरशात बघितलं का ? इतक्या वर्षात किती घोटाळे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले ते घोटाळे मोजताना बाराखडीही कमी पडेल. आघाडी म्हणजे भोक पडलेला फुगा, आघाडीला आकार नाही, राजकारण करताना आरोप करा, आम्हाला लाज वाटते का विचारता ? मग दहा वर्षात जेवढे घोटाळे झाले असतील तेवढेच काढा मग आम्हाला विचार लाज वाटते का ? अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शौचालयातील नॅपकीनमध्येही घोटाळा करणारी औलाद आहेत. कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसोबत एकही फोटो पाहिला नाही आणि काल चारा छावणीमध्ये जाऊन चौकशी करता. आघाडीच्या काळात या चारा छावणीतही त्यांनी घोटाळा केला. लोक विसरत नाहीत. पाच वर्षापूर्वी जनतेने तुमच्या पार्श्वभागावर लाथ मारुन बाहेर काढले आणि आम्हाला विचारता लाज वाटते का ? असे तुम्ही बोलता. गेली ५०-६० वर्ष माजलेली लोक पाच वर्षात सुधारतील का ? शरद पवार संरक्षणमंत्री असताना संरक्षण भुखंडही लाटण्याचा प्रयत्न केला. लाज वाटेल अस आम्ही कधी केले नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like