Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? जाणून घ्या ठाकरे गट, राष्ट्रवादी व काँग्रेसला जागा किती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Elections 2024 | महाराष्ट्रातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीने विजय मिळवला. यानंतर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) एकत्र लढवण्याची तयारी सुरु केली. प्रलंबित पालिका निवडणुका लवकच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असताना अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला (Seat Distribution In Mahavikas Aghadi For Lok Sabha) जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असताना लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचे सांगितले जात आहे. तर सर्वात कमी जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहे. यापैकी 21 जागा ठाकरे गट,
19 जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि 8 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवेल असं सांगितलं जात आहे.
मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरे गट तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवू शकते.
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

दरम्यान, भाजपने (BJP) देशात तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची तयारी सुरु केली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत ‘मिशन 45’ हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यभरात भाजपचे नेते कामाला
लागले आहेत. याशिवाय केंद्रातील मंत्र्यांवर देखील महाराष्ट्रातील काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title :- Lok Sabha Elections 2024 | lok sabha elections 2024 the mahavikas aghadis seat allocation formula for the lok sabha elections was decided

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Symptoms Of Influenza Virus | इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्र्याचे आवाहन

Suresh Hemnani | महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या सदस्यपदी सुरेश हेमनानी यांची नियुक्ती

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे