‘हा’ पक्ष महाराष्ट्रात लढवणार १० जागी लोकसभा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे रण जोरदार तापू लागण्याने आम आदमी पक्षाने हि निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात आम आदमी पार्टी १० जागा लढणार असून पुण्याची हि जागा आप लढवणार आहे. ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’ करून आप महाराष्ट्रातील छोट्या पक्षांना सोबत घेऊन हि निवडणूक लढणार आहे.

काँग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप युती यांना आव्हान देण्यासाठी तसेच जनते पुढे वेगळा पर्याय ठेवण्यासाठी आप महाराष्ट्रात  ‘समृद्ध महाराष्ट्र आघाडी’च्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पुण्याच्या जागे सहित नागपूर आणि मुंबई मधील काही जागांसह महाराष्ट्रात १० जागी आप उमेदवारी करणार आहे.

पुण्यात गेल्या लोकसभा निवडणुकीला पक्षाने जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांना उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत सुभाष वारे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना २८ हजार ६६७ मते मिळाली होती तर त्यांना एकूण मताच्या फक्त २. ८८ टक्के मते मिळाली होती. आता मात्र सुभाष वारे यांनी आपसाठी काम करणे सोडून दिले आहे. त्यामुळे आप उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हा पुणेकरांच्या उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

आम आदमी पक्षाने दिल्ली राज्यात स्वामिनाथन अयोगाच्या शिफारशी लागू केल्याचे आपने मंडईत साखर वाटून स्वागत केले. या निर्णयाचा फायदा देशात इतर भागात हि होऊ शकतो त्यामुळे आपने निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे.