‘गर्भीत’ इशार्‍यानंतरही सरकारी निवासस्थान न सोडणार्‍या 27 माजी खासदारांना पोलिसी ‘खाक्या’ ! वीज, पाणी बंद होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या माजी खासदारांच्या विरोधात सक्त पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेच्या आवास समितीने मंगळवारी निर्देश देण्यात आले की बंगला रिक्त न करणाऱ्या 27 माजी खासदारांच्या सरकारी बंगल्याची वीज, पाणी, गॅस कनेक्शन कापण्यात येईल. याशिवाय समितीने खासदारांना देण्यात आलेले सरकारी बंगले रिक्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारी बंगले खाली करण्यासाठी घेणार दिल्ली पोलिसांची मदत
भाजप खासदार सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या आवास समितीने निश्चित केले आले आहे की लुटियंस दिल्लीमधील माजी खासदारांना देण्यात आलेले सरकारी बंगले रिक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांची मदत घेण्यात येईल.

नियमांनुसार माजी खासदारांना मागील लोकसभा भंग झाल्यानंतर एक महिन्यात सरकारी निवासस्थान रिक्त करावे लागते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांंनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर केंद्रीय कॅबिनेटच्या शिफारसीनंतर 25 मेला झालेल्या 16 व्या लोकसभेला तात्काळ भंग करण्याचा निर्णय घेतला होता.

नव्या खासदाराने निवासस्थान देण्यात येत आहेत अडचणी
16 वी लोकसभा भंग करण्यात आल्यानंतर चार महिन्यानंतर माजी खासदार सरकारी निवास रिक्त करण्यास तयार नाहीत. यामुळे नव्याने निवडणूक गेलेल्या खासदारांना निवासस्थान वाटपात समस्या उद्भवत आहे. त्यांना वेस्टर्न कोर्ट किंवा स्टेट गेस्ट हाऊसमध्ये रहावे लागत आहे.

त्यांना रोजच्या कामासाठी वेस्टर्न कोर्टला किंवा स्टेट गेस्ट हाऊसला यावे जावे लागते. नव्या खासदारांच्या अनेकदा करण्यात येणाऱ्या मागणीनंतर देखील त्यांना निवासस्थानचे वाटप करण्यात आले नाही. जन अधिकार पक्षाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादवने सरकारी निवासस्थानाचे खूप नुकसान केले होते. त्यांच्या सरकारी निवासाच्या खिडक्या, दरवाजे, फरशा देखील तुटलेल्या आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी