‘दादरा – नगर हवेली’ आणि ‘दीव-दमन’ चे विलिनीकरण विधेयक लोकसभेत ‘मंजूर’ ! आता दोन्ही मिळून एकच केंद्र’शासित’ प्रदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश असलेले दादरा आणि नगर हवेली तसेच दीव दमन मिळून एक केंद्र शासित प्रदेश बनवण्याचे विधेयक पारित करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंगळवारी लोकसभेत दादरा-नगर हवेली आणि दीव – दमन (केंद्रशासित प्रदेशाचे विलिन) विधेयक 2019 सादर करण्यात आले होते. ते आज लोकसभेत पारित करण्यात आले.

विधेयक पारित झाल्यानंतर आता नव्या केंद्रशासित प्रदेशाचे नाव दादरा आणि नगर हवेली किंवा दमन दीव असे असेल.

विलिनीकरणाचा उद्देश –
केंद्रीय गृहराज्य मंत्री किशन रेड्डी काल म्हणाले की किमान सरकार आणि अधिक सुशासनाचे सरकार या नीतिला लक्षात घेऊन तसेच दोन्ही केंद्रशासित प्रदेशाची कमी असलेली लोकसंख्या आणि सीमित क्षेत्र याचा विचार करुन अधिकाऱ्यांची सेवा आधिक उत्तम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

सध्याची स्थिती काय होती –
गुजरातजवळ पश्चिम किनारीभागात स्थित दोन्ही केंद्रशासित प्रदेश एक दुसऱ्यापासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. दोघाचे एक वेग वेगळे बजेट बनत होते आणि सचिवालय देखील वेगवेगळी होते. दादरा नगर हवेलीमध्ये फक्त 1 जिल्हा आहे त दीव दमन मध्ये 2 जिल्हे आहेत. परंतू आज लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर दादरा नगर हवेली आणि दीव दमनचे विलिनीकरण होईल. आता हे एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाईल.

Visit : Policenama.com