Exit Poll नंतर प्रियंका गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ‘हा’ खास ‘ऑडिओ’ संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेचा निकाल येत्या २३ तारखेला लागणार आहे. निकाल लागण्याआधीच एक्झिट पोलद्वारे माध्यमांनी आणि काही एजन्सीजनी निवडणुकीच्या निकालाचा अन्दाज वर्तवला आहे. त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत जनता भाजपला कौल देईल असा अन्दाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोल नंतर मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक्झिट पोल आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा,’ असे आवाहन प्रियंका यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले आहे. प्रियांका गांधी यांनी एका ऑडिओ संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे.

एक्झिट पोल म्हणजे हतबल होण्यासाठीच्या अफवा

यावेळी बोलताना प्रियांका म्हणाल्या, “अफवा आणि एक्झिट पोल पाहून खचून जाऊ नका. तुम्ही हतबल व्हावं यासाठीच या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही सजग राहा. निकालाच्या दिवशी स्ट्राँग रूम आणि मतदान केंद्रावर ठाण मांडून बसा, दक्ष रहा, असं आवाहन करतानाच आपल्या सर्वांना मेहनतीचं फळ निश्चित मिळेल “, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

एक्झिट पोलचा कौल भाजपला

देशभरात भाजपाला ३०० जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलवरून विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे भाजपला बहुमत मिळणार की नाही त्यावरून पुढचे अंदाज बांधले जात आहेत. अशातच प्रियांका गांधी यांनी आपल्या कर्यकर्त्यांना एक्झिट पोल फोल आल्याचे सांगून डगमगून न जाण्याचे आवाहन केलं आहे.