संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी बंद, 8 कोटी रुपये वाचवण्याची आहे योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  संसदेच्या कँटीनमध्ये सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी ही माहिती दिली. यासोबतच आता संसदेच्या कँटीनमध्ये जेवण महाग होणार आहे. संसदेची योजना आहे की, सबसिडी बंद केल्याने 8 कोटी रुपयांची बचत होईल.

लोकसभा स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, बजेट सत्रापासून कँटीनेमध्ये सबसिडी बंद केली जात आहे. संसदेच्या कँटीनमध्ये जेवण महाग होईल. कँटीनमध्ये मिळणारी सबसिडी बंद करण्यासाठी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी प्रस्ताव दिला होता. सर्व पक्षांनी यावर सहमती व्यक्त केली होती. संसदेच्या कँटीनेमध्ये मिळणार्‍या सबसिडीवरून जनतेतून अनेकदा टीका होत होती.

संसदेच्या कँटीनचे दरपत्रक सुद्धा सोशल मीडियावर वायरल झाले होते. सबसिडी अंतर्गत देशातील खासदारांना संसदेच्या कँटीनेमध्ये जेवण अतिशय कमी किंमतीत मिळत होते.