आठवतोय का टेलकॉम घोटाळा ? ‘त्या’ माजी मंत्र्याचा नातवासह काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिलली : पोलीसनामा ऑनलाईन – माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री पंडित सुखराम आणि त्यांचे नातू आश्रय शर्मा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. दिल्ली येथे काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, मंडी येथून सुखराम यांचा नातू आश्रय शर्मा काँगेसचे उमेदवार असतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुखराम यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुखराम म्हणाले, “मी स्वगृही परतलो आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य काँग्रेससोबत घालवले आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मनात कोणताच द्वेष नाही. मी माझा नातू काँग्रेसला दिला आहे. तो विकासाच्या वाटेवर काम करेल,” असा विश्वास देखील सुखराम यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री सुखराम यांच्याविषयी…

माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना आपल्या आधिकराचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तसेच टेलकॉम क्षेत्रात घोटाळा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. ते १९९३ – १९९६ या काळात टेल्कोम मंत्री होते. पण त्यांना दोषी ठरवण्यात आल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २०११ साली ८४ वर्षीय सुखराम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच वेळी दिल्लीतल्या जंतर – मंतर वर समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विऱोधात उपोषण चालू होते. २००९ साली सुखराम यांना ४.२५ करोड रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता साठवल्या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. आता सुखराम यांच्यासह नातवाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.