पुण्यात मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.  २३ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह मध्य प्रदाशातील राज्य राखीव दलासह ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे़.

पुणे शहरात पुण्यासह बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे.  पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन्ही मतदार संघांतील ४५२ इमारतीमध्ये असलेल्या  २ हजार ५०९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

असा असणार आहे बंदोबस्त

  • पोलीस अधिकारी – १५५, होमगार्ड – १८००, राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, केंद्रीय सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, मध्य प्रदेश राज्य राखीव पोलीस दल यांच्या प्रत्येकी १ कंपनी
  • २ पोलीस ठाण्यांचा एक सेक्टर
  • त्या सेक्टरमध्ये बुथच्या संख्येनुसार बंदोबस्तासाठी एक वाहन, १ अधिकारी व ३ कर्मचारी यांचे जलद कृती दल असेल. तर अनुचित प्रकार आटोक्यात आणण्यासाठी प्रॉम्ट रिपॉन्स टीम असणार असून ते घटनास्थळी ३ ते ५ मिनिटात पोहचतील अशी बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • प्रत्येक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त यांच्याबरोबर १० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असेल़.
  • तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे़ संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़
  • निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व ३० पोलीस ठाण्यात फ्लार्इंग स्कॉड तसेच सर्व्हेलन्स स्टॅट्रिक फोर्स असणार आहे़. ते संपूर्ण मतदारसंघात फिरुन माहिती घेतील व थेट निवडणुक आयोगाला रिर्पोटिंग करतील. त्यांच्याबरोबर व्हिडिओग्राफी करणारे पथकही असणार आहे़स्ट्रॉंग रुमसाठी तीन स्तरीय बंदोबस्त
  • मतदान झाल्यानंतर सर्व इव्हिएम मशीन कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवण्यात येणार आहेते.
  • पहिल्या स्तरात केंद्रीय सुरक्षा दलाची ३० जणांची तुकडी
  •  त्यानंतरच्या सर्कलमध्ये राज्य राखीव पोलीस दलाची व त्यानंतर सर्वात बाहेर
  • शहर पोलीस दलाचे पथक २४ तास तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय सीसीटीव्हीची निगराणी राहणार आहे़