Lokmanya Tilak National Award | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोदी-पवार एकाच मंचावर, नरेंद्र मोदींनी हात पुढं केला; शरद पवारांनी पाठ थोपटली

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune Visit) येणार असल्याने दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याकडे (Lokmanya Tilak National Award) देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार मोदींनी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर येताना मान्यवरांना हात जोडून नमस्कार केला. मात्र, यावेळी मोदींनी शरद पवार यांच्यासमोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवार यांनी देखील स्मीतहास्य करत मोदींची पाठ थोपटली.

नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी झाला. मात्र, शरद पवार यांनी आपला भाजपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट कले. मात्र, आज पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) सोहळ्याला मोदींसोबत व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या राजकीय वर्तुळात आणि इंडिया आघाडीतही काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनीही उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली होती.

पुरस्कार सोहळ्या दरम्यान मोदी आणि शरद पवार यांच्या अल्पसा पण मजेशीर संवाद झाल्याचे पाहायला मिळाला.
कारण, मोदींनी काहीतरी बोलल्यानंतर शरद पवार यांनी हसून त्यांना दाद दिली.
तसेच, मोदींचा हात हातात घेत त्यांची पाठही थोपटली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार,
राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), सुशिलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Benefits of Karonda | आरोग्यासाठी अमृत समान आहे ‘हे’ छोटे लाल फळ,
कॅन्सरपासून सुद्धा वाचवू शकते, कसे वापरावे जाणून घ्या

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर दुर्घटना; गर्डर कोसळल्याने पाच अभियंत्यांसह १७ जणांचा मृत्यु, ३ जखमी

PM Modi’s Pune Visit: Metro Rail Inauguration, Waste-to-Energy Plant, and PMAY Houses – Live Updates