लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेला न्यूबा अवॉर्ड प्रदान

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (न्यूबा) ची नुकतीच चेन्नई येथे परिषद संपन्न झाली. यामध्ये येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेला बँकेचे रुपये 150 ते 200 कोटी ठेवींच्या गटातून नाशिक मध्ये उत्कृष्ट बँक म्हणून चेन्नईत प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

लोकनेते दत्ताजी पाटील लासलगाव बँकेस न्यूबा 2020 पुरस्कार हा न्यूबाचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, महाराष्ट्र राज्य बँक असोशियन अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दत्ता गायकवाड यांच्या हस्ते बँकेचे संचालक केदारनाथ घोटेकर, राजाराम मेमाणे यांनी स्वीकारला.

लोकनेते दत्ताजी पाटील सह. बँक लासलगाव ही ग्रामीण क्षेत्रातील विश्वास पात्र बँक आहे. बँकेची स्थापना 1971 मध्ये झाली असून आज नॅशनल बँकेच्या बरोबरीने सेवा देत आहे. सध्या लोकनेते दत्ताजी पाटील बँकेच्या ठेवी 220 कोटी रुपयांच्या असून या बँकेने 125 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तसेच बँकेने सुरक्षित 90 कोटींची सरकारी रोखे व मुदत ठेवीत गुंतवणूक केलेली आहे. बँकेस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल नाशिक जिल्हात आणि ग्रामीण परिसरातील अनेक मान्यवरांनी बँकेचे चेअरमन नानासाहेब पाटील व संचालक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कोल्हे, व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/