लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या 24 व्या स्मृती सोहळ्याचे आयोजन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लोकनेते दत्ताजी पाटील यांचा चोविसावा स्मृती सोहळा 26 ते 31 जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे, अशी माहिती निमंत्रक नानासाहेब पाटील व संजय पाटील यांनी दिली.

सालाबादाप्रमाणे सोहळ्याची सुरुवात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाने होणार आहे. ध्वजारोहण राष्ट्रपती पारितोषिक विजेते आव्हाड गुरुजी यांच्या हस्ते व येथील पत्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी दुपारी शालेय विद्यार्थ्यांचा संस्कृती विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे.

सोमवारी 27 जानेवारीला सकाळी साक्षी ढगे हिचे “शिवचरित्र” यावर जाहीर व्याख्यान होणार आहे तर दुपारी शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजता आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

बुधवारी 29 ला संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम “महाराष्ट्राची लोकधारा” जगदीश चव्हाण यांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी 30 जानेवारीला शालेय विद्यार्थी आयोजित आनंदनगरी चा कार्यक्रम होणार आहे. 31 जानेवारीला सकाळी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तर सायंकाळी हभप आचार्य अमृत महाराज बीड यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी या कार्यक्रमाचा लासलगाव परिसरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे नानासाहेब पाटील, संजय पाटील यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –