लोकनेते विद्यालयात आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या चोविसाव्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या सर्व विद्याशाखांच्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन दादासाहेब कदम यांच्या हस्ते झाले तसेच अध्यक्ष म्हणून मधुकर सरोदे, तर प्रमुख पाहुणे संदीप दीक्षित, ज्ञानेश्वर इंगळे, राजाभाऊ कराड, राजाभाऊ जाधव हे उपस्थित होते.

या स्पर्धेत प्राथमिक गट मुले प्रथम पारितोषिक इयत्ता चौथी अ, प्राथमिक गट मुली प्रथम पारितोषिक इयत्ता चौथी (ब) जिजामाता प्राथमिक शाळा लासलगाव. लहान गट मुले प्रथम पारितोषिक संत ज्ञानेश्वर विद्यालय भायगाव, लहान गट मुली प्रथम पारितोषिक जिजामाता कन्या विद्यालय लासलगाव, मोठा गट मुले प्रथम पारितोषिक लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय लासलगाव, मोठा गट मुली प्रथम पारितोषिक जिजामाता कन्या विद्यालय लासलगाव, उच्च माध्यमिक गटात प्रथम पारितोषिक मुले व मुली अकरावी विज्ञान लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय लासलगाव यांनी पटकावले.

प्राथमिक, लहान, मोठा आणि उच्च माध्यमिक गटात बेस्ट कॅचर सार्थक धनवटे, कार्तिकी सानप, राहुल भडांगे, गायत्री कोटकर, अथर्व जाधव, जयश्री बेंडकुळे, संकेत फड यांना मिळाले. तर बेस्ट रेडर म्हणून सार्थक पोटे, तृप्ती पल्हाळ, ईश्वरी शिंदे, दीपक कोरडे, अभय पाटील, श्रद्धा भिलोरे, प्रतिक हिरे यांना तर अष्टपैलू खेळाडू म्हणून यश पालवे आणि गायत्री कोटकर यांना स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. दत्ता मोटेगावकर, शंतनू पाटील, शामराव आहेर, सुभाष देशमुख, प्रदीप माठा, दिलीप पानगव्हाणे, किशोर क्षिरसागर, साहेबराव वाकचौरे, भारत माळी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पं. स. सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका निताताई पाटील, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापक विश्वास पाटील, अनिस काझी, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे क्रीडाशिक्षक शिवाजी मवाळ, केशव तासकर, दशरथ पायमोडे, प्रकाश कोल्हे, विलास दखणे, शिवाजी पाटील, रमेश पगार, रामदास कदम, राजेंद्र वाकचौरे, चंद्रकांत नेटारे, प्रमोद पवार, संजय कोठावदे, उमेश मोरे, संदीप गंभीरे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फेसबुक पेज लाईक करा