Coronavirus : धक्कादायक ! ‘लोकपाल’चे सदस्य जस्टिस AK त्रिपाठी यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकपाल समितीचे सदस्य आणि निवृत्त न्यायाधिश एके त्रिपाठी यांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला. त्रिपाठी यांना 2 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. मृत्यू झाला त्यावेळी ते 63 वर्षांचे होते. एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्रिपाठी यांचा मुलगा आणि स्वयंपाकी यांना देखील कोरोना झाला होता. मात्र, यातून ते बरे झाले परंतु त्रिपाठी यांचा यामध्ये मृत्यू झाला.

देशाच्या अतिमहत्त्वाच्या लोकपाल समितीच्या चार सदस्यापैकी ते एक होते. बिहारचे अतिरिक्त महाधिवक्ते आणि नंतर ते पटना उच्च न्यायालयाचे न्यायाधिश झाले होते. 23 मार्चलाच त्यांची लोकपालचे सदस्य म्हणून नियुक्त झाली होती. देशात तर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात असला तरी संख्येत दररोज वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37776 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या 1223 वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगात 32 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. तर 2 लाख 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना व्हायरसचे म्युटेशन झालं आहे का याचा अभ्यास आयसीएमआरचे संशोधक करत आहेत.