Loksabha : पंतप्रधान मोदींची बारामतीमधील सभा लांबणीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिलला होणारी नियोजित सभा पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली. पंतप्रधान देशभरात दोनशेहून अधिक सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सभांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

मोदी यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमामुळे १० एप्रिल ऐवजी पुढच्या टप्प्यात बारामती मतदारसंघात सभा घेतली, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बारामतीची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचीच असल्याने भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे.

नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा व्हावी असा सर्वांचाच आग्रह असल्याने मोदी यांनी ती मान्य केली आहे. सभेची तारिख निश्चित होताच त्याची घोषणा केली जाईल, असेही पाटील यांनी जाहीर केले. शेवटच्या टप्प्यात सभा घेतल्याचा अधिक लाभ मतदानातून होतो, अशी अटकळ असल्यानेही कदाचित ही सभा शेवटचा टप्प्यात व्हावी अशी भाजपचीच व्यूहरचना असावी असाही अंदाज व्यक्त होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like