…म्हणून रंगात आलेले भाषण अजित पवारांनी अचानक थांबवले

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ माळेगाव येथे अजित पवार यांची प्रचार सभा सुरू होती. रोड लगत सुरू असलेली पवारांची सभा ऐन रंगात आली असताना अचानक रोडवरून भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचाराच्या गाड्या जात होत्या. गाड्यामधील साऊंडमधून भाजपचा प्रचार सुरू होता. त्यामुळे अजित पवार यांना भाषणात अडथळा झाला आणि त्यांनी आपले भाषण थाबवले. या परिस्थिवर न बोलतील ते पवार कसले ? त्यांनी लगचे समयसुचतकता दाखवत आपल्या खास शैलीत भाष्य केले आणि सभेच्या ठिकाणी हशा पिकला.

अजित पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणतायेत ते ऐकायला ते आलेत. आरं अजित पवार बोलतो ते ऐकल्यावर तू सुद्धा घड्याळाचं बटण दाबशिल. माईकवर पण तू सांगशिल आता ती (कमळाचे नाव न घेता) नको घड्याळ घड्याळ…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा मतदारसंघात झालेल्या सभेत आपल्याला जातीवरून टार्गेट करण्यात येत असल्याचे सांगितले. यावर मोदींना प्रत्युत्तर देताना, नरेंद्र मोदींना कधी कुणी जातीवरुन टार्गेट केलं आता बोलायला मुद्देच नसल्यामुळे मोदी असं करत आहेत असा घणाघात अजित पवार यांनी केली.

‘चौकीदार चोर है,’ असं म्हणत राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार मोदींना लक्ष्य केलं आहे. पण मोदींनी या टीकेला आता थेट आपल्या जातीशी जोडल्याचं पाहायला मिळालं आहे.

You might also like