अशोक चव्हाण यांच्या ‘त्या’ सभेपूर्वी माजी नगराध्यक्ष व काँग्रेस पदाधिकारी यांच्या मध्ये खडाजंगी
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – भोकर येथे अशोक चव्हाण यांची उमेदवारी प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री यांच्या सोबत भोकर येथील नवा मोंढा मैदान येथे होती,नांदेड लोकसभेचे वारे मोदी लाटेत काँग्रेस कडून वाहत असताना त्या प्रवाहात काँग्रेस पदाधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी केल्याने तो प्रवाह वेगळ्या दिशेने कल घेण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत वाद असल्याचे आयोजित सभेपूर्वी काँग्रेसच्या दोन पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या खडाजंगी मध्ये दिसुन आले. हा वाद होण्याचे कारण म्हणजे सभे साठी गर्दी जमवण्यासाठी होती अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण येण्याअगोदर स्थानिक पदाधिकारी यांना शांत करण्यासाठी काँग्रेस मधील काही कार्यकर्ते धावले असल्याचे समजले. हा वाद आता जरी वाद मिटला असला तरी झालेल्या वादाचे रूपांतर आणखी वेगळ्या भूमिकेत होईल का ? अशी चर्चा भोकर शहरात सुरू आहे.
वाद केलेले दोन्ही कार्यकर्ते अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकट वर्तीय असल्याचे समजले आहे. ज्यावेळी स्टेजवर वाद झाला त्यावेळी मोठ्या संख्येने नांदेड येथील पदाधिकारी, शहरातील लोक (मतदार ), महिला उपस्थित असल्याने चर्चेला अधिक उत आला. हेच पदाधिकारी एकीकडे काँग्रेस पक्षाचे व अशोक चव्हाण यांचे गोडवे गाताना दिसतात तर दुसरीकडे यांच्यामधे अंतर्गत वाद असल्याचे दिसते आहे.