बंडखोरीमुळे भाजपच्या डॉ. हिना गावितांची डोकेदुखी वाढली

नंदुरबार : पोलीसानामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत नवीनवीन घडामोडी दिवसेंदिवस घडत आहेत. नंदुरबारचे लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने डॉ. सुहास नाटवदकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताला नाही. त्यामुळे नंदुरबारमध्ये काँग्रेसचे अ‍ॅड. के.सी.पाडवी, भाजपाच्या खा.डॉ.हिना गावीत आणि अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर अशी तिरंगी चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. नटावदकर यांनी भाजपशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज केला. १२ एप्रिल हा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख होती. त्यामुळे नाटावदकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी भाजपमधून होत होती. मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. दोन उमेदवारांनी मात्र अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नंदुरबारमध्ये एकून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. परंतू येथे मुख्य लढत ही काँग्रेसतर्फे अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपातर्फे खा.डॉ.हिना गावीत व अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांच्यात होणार आहे.

दरम्यान, डॉ.सुहास नटावदकर यांचे नंदुरबार जिल्ह्यात शैक्षणिक जाळे मोठे आहे. डॉ. नटावदकर यांनी २००४ आणि २००९मध्ये लोकसभा लढवली आहे. तसंच अधिक मतांनी विजयीही झाले होते. मात्र भाजपकडून हिना गावित यांना उमेदवारी दिल्याने नाटावदकर यांनी अपक्ष अर्ज केला आहे. त्यांच्या मागे लागूनही त्यांनी हा अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता नटावदकर यांच्या उमेदवारीने सर्वांच्याच अडचणी वाढणार आहेत. मात्र आता याचा अधिक फटका कोणाला बसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.