मोदीजी हिंम्मत असेल तर म्हणा…भुजबळांचे मोदींना ओपन चॅलेंज

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – धुळे मतदार संघात काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची मनमाड येथे सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करून त्यांच्यावर जोरदार टीका केली.

भुजबळांचे मोदींना चॅलेंज
यावेळी मोदींच्या भाषणाच्या शैलीवरून भुजबळांनी मोदींना भर सभेत आव्हान दिले, ” मोदीजी माझं तुम्हाला आव्हान आहे तुम्ही आल्यानंतर पहिल्यासारखं हसत हसत म्हणा ना, अच्छे दिन…! हिम्मत असेल तर सांगा मी शेतकऱ्यांचे कल्याण केले. एकसुद्धा आत्महत्या झाली नाही. हिम्मत असे तर सांगा पाच वर्षात १० कोटी मुलांना मी नोकऱ्या लावल्या. हिम्मत असेल तर सांगा राफेलमध्ये घोटाळा झाला नाही मला मत द्या ” असे ओपन चॅलेंज भुजबळ यांनी यावेळी मोदींना दिले.

राज ठाकरे त्यांच्या जाहीर सभेमध्ये पुरावे सादर करत मोदी सरकारवर हल्लाबोल करतात. त्याचपद्धतीने छगन भुजबळांनी पुरावे सादर करत शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला. भाजपवर टीका करणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे आता सगळं विसरले आहेत. त्यामुळे ते माझ्याबद्दल काय बोलले हे सांगण्याची वेळ आल्याचंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच युवकांना संधी मिळावी या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली असे ते म्हणाले.

पवार माघार घेण्याचा संबंध नाही
इतकेच नव्हे तर शरद पवार यांनी आत्तापर्यंत पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे माघार घेण्याचा संबंध नाही. वंचित आघाडी सोबत यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना 4 जागा द्यायची तयारी होती. मात्र आरएसएसवरील बंदी या मागणीमुळे बोलणी फिस्कटल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. तसेच वंचित आघाडीला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत समझोता करण्यात रस नव्हता असं आमचं मत असेही ते म्हणाले.

याचबरोबर सरकार विरोधात नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणं यामुळं रोष आहे. मागील साडेचार वर्षापासून नाशिकचा विकास थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकासकामे केली नाहीत. नाशिक बेवारस झालं असून विचारणारं कुणी नाही. अशी टीकाही त्यांनी केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like