…म्हणून अभिनेते प्रकाश राज यांची काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरुतून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाश राज यांनी फेक न्यूज प्रकरणी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रकाश राज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. या विरोधात राज यांनी काँग्रेसचे रिझवान अर्शद यांचे जवळचे समजले जाणारे मजहर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

प्रकाश राज यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये प्रकाश राज म्हणतात, कार्यकर्त्यांसोबत वाद सुरू असताना काँग्रेसचे उमेदवार रिझवान यांच्याशी मी हात मिळवला. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची फेक न्यूज पसरवण्यात आली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून प्रकाश राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे खोटी बातमी पसरवली गेली. त्यामुळे त्यांना मतदान करून आपले मत वाया घालवू नका असे सांगितले आहे. आणि हे काम मजहर अहमद यांनी केले आहे.

एका अन्य ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणतात की, काँग्रेसची फेक न्यूज. या पक्षाची हे घृणास्पद राजकारण पाहा. काँग्रेसची वर्तुवणूक लाजिरवाणी आहे. मी काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. हा मेसेज एवढा शेअऱ करा की काँग्रेसने पसरवलेल्या फेक न्यूजला प्रत्युत्तर म्हणून वापरली जाईल.