नरेंद्र मोदी नव्हे तर भाजपाच्या ‘या’ बडया नेत्याची उद्या बारामतीत जाहिर सभा

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती  मतदार संघाच्या निकालाकडे  केवळ राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष्य लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समाजल्या जाणाऱ्या या मतदार संघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. यंदा बारामती मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपकडून पहिल्यांदाच स्थानिक उमेदवार जाहीर करीत कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारमतीत पंतप्रधान मोदींची सभा झाली नाही. पण उद्या बारामतीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमित शहा खाजगी विमानाने बारामती विमानतळावर येणार असून, बारामतीची सभा उरकून ते पुण्याला जाणार आहेत. त्यानंतर कर्नाटकात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे ग्राऊंडवर अमित शहा यांच्या सभेची भाजपकडून जय्यत तयारी सुरु असून, राष्ट्रीय अध्यक्ष प्रथमच बारामतीत येत असल्याने भाजपची सर्व यंत्रणा झटून कामाला लागल्याचे आज चित्र आहे. बारामतीत अमित शहा शरद पवारांवर काय टीका करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

वर्धा येथे मोदींची सभा झाली यात त्यांनी पवार कुटुंबाच्या घराणेशाही विरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर  बारामती मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा होणार होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासंदर्भातल्या बातम्या देखील प्रसार माध्यमातून झळकल्या होत्या. पण मोदींची सभा झाली नाही. अखेर उद्या बारामती येथे अमित शहा यांची सभा होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like