home page top 1

ठाणे : रंगदार लढतीत राजन विचारे यांचा विजय

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात लढत झाली. या रंगदार लढतीमध्ये राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा परावभव केला. राजन विचारे यांनी परांजपे यांचा तब्बल ४ लाख २ हजार ६६० एवढ्या मताने पराभव केला. आनंद परांजपे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

वंचित बहुजन आघाडीने ठाण्यातून मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी दिली असली तरी या ठिकाणी दुरंगीच लढत झाली. ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत साईटवरील आहे. यामध्ये थोडा फरक पडू शकतो

लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा तब्बल 2.80 लाख इतक्या मताधिक्यांनी पराभव केला होता. राजन विचारे यांना 5.95 लाख मते मिळाली होती तर संजीव नाईक यांना 3.14 लाख मते मिळाली होती.

उमेदवार                               पक्ष                       मिळालेली मतं
राजन विचारे                        शिवसेना                      ७२००५४
आनंद परांजपे                  राष्ट्रवादी काँग्रेस                ३१७३९४
मल्लिकार्जुन पुजारी    वंचित बहुजन आघाडी             ४४६०७

ठाणेमधील एकूण मतदान – २३ लाख ७० हजार २७३
कल्याणमध्ये झालेले मतदान – ११ लाख ६७ हजार ८९४

Loading...
You might also like