तुम्ही ठरवलंय ; मग मी बी ध्यानात ठेवलंय

शरद पवारांचा सतेज पाटलांवर निशाणा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापुरात कोणी तरी आम्ही ठरवलंय असे काही ऐकायला मिळाले. याबाबत चौकशी केली असता आमच्याच कोणी तरी भाऊबंदाने हे वक्तव्य केले आहे असे समजले. तुम्ही जर ठरवलंय, तर मग मी बी ध्यान्यात ठेवलंय असा इशारा शरद पवार यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला. खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ पेठवडगाव येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना भाजप युतीचे संजय मंडलिक यांच्यामध्ये चुरस आहे. सतेज पाटील यांनी शिवसेनेचे मंडलिक यांचा प्रचार सुरू केला आहे. ‘आमचं ठरलंय’ अशी टॅगलाईन चालवली आहे. आमदार पाटील यांचा शुक्रवारी वाढवदिवस होता. यानिमित्त सोशल मीडियासह सर्वत्र ‘आमचं ठरलंय’ अशी जाहिरातबाजी करण्यात आली. याचाच आधार घेत पवार यांनी सतेज पाटील यांच्यावर नशाणा साधला.

कृष्णा, पंचगंगेचे पाणी प्यायलेला जो असेल आणि या जिल्ह्यातील मातीतील ज्यांनी अन्न खाल्लेल असेल तो अशा प्रकारची संकुचित वृत्तीला कधीही जाणार नाही. देशाच्या हितासाठी जे करावे लागेल, ते करण्यासाठी या जिल्ह्यातील प्रत्येक घटक प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Loading...
You might also like