अरुण गवळीच्या पक्षाची ‘या’ मतदारसंघात सेनेला साथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेना नगरसेवकाच्या खुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेने दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांना पाठिंबा जाहिर केला आहे. दक्षिण मुंबईमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. त्यामुळे आता याचा फायदा अरविंद सावंत यांना होऊ शकतो.

दक्षिण मुंबई मतदारसंघातील चिंचपोकळी, भायखळा या परिसरात अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचं वर्चस्व आहे. पुर्वीच्या चिंचपोकळशी मतदारसंघातून अरुण गवळी निवडून आला होता. अरुण गवळीची मुलगी नगरसेविका आहे. त्याचा महायुतीला येथून फायदा होऊ शकतो.

महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मुंबई पालिकेतील स्थायीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि अरुण गवळीची पत्नी आशा गवळी, मुलगी नीता गवळी, विजय अहिर यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर गीता गवळी यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.