ब्रेकिंग : भाजपकडून पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गडकरींसह 182 जणांच्या उमेदवारीची घोषणा

महाराष्ट्रातील 16 जणांची उमेदवारी घोषित

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन –लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससह इतर काही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर केलेल्या आहेत. सत्‍ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहिर झालेली नव्हती. शेवटी आज (गुरूवार) भाजपकडून पहिली यादी जाहिर करण्यात आली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह 182 उमेदवारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी आणि राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदार संघातुन तर नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढणार आहेत.

राज्यात शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांची युती आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची आघाडी आहे. काँग्रेसकडून राज्यातील बहुतांश उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या वाटयाला आलेल्यापैकी सर्व जागेवर (एक-दोन जागा सोडून) उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीकडून माढा आणि इतर एक-दोन जागेवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँंग्रेसने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर सेना-भाजपकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले असतानाच भाजपने आज (गुरूवार) पहिली यादी जाहिर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 16  मतदार संघाचा समावेश आहे.

मतदार संघाचे नाव आणि त्यापुढे भाजपच्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

नागपूर : नितीन गडकरी,
नंदुरबार :डॉ. हिना विजयकुमार गावित ,
धुळे : सुभाष भामरे,
रावेर : रक्षा निखील खडसे,
अकोला : संजय शर्मा धोत्रे,
वर्धा  : रामदास चंद्रभान तडस,
गडचिरोली-चिमुर :  अशोक महादेवराव मेटगे,
चंद्रपूर  : हंसराज अहिर,
जालना : रावसाहेब दानवे,
भिवंडी  : कपिल पाटील,
मुंबई उत्‍तर : गोपाल शेट्टी,
मुंबई नॉर्थ सेंट्रल : पुनम महाजन,
बीड : डॉ. प्रितम मुंडे,
लातूर : सुधाकर भालेराव श्रृंगारे
सांगली : संजयकाका पाटील,
अहमदनगर : डॉ. सुजय विखे