उदयनराजेंसाठी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ‘कठीण’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक आहे. परंतू राज्याचे लक्ष लागल आहे ते सातारा लोकसभा पोटनिवडणूकीकडे. चर्चा रंगली ती उदयनराजे भोसले विजयी होणार की राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील बाजी मारणार. परंतू उदयनराजे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरणार आणि 24 तारखेच्या निकालात हे स्पष्ट होईल असा दावा शिवसेनेचे संजय राऊत य
यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की उदयनराजे तीन महिन्यांपूर्वी एका पक्षातून निवडून येतात. 3 महिन्यात त्याचे ह्दयपरिवर्तन होते. दुसऱ्या पक्षात जाऊन लोकांवर निवडणूक लादतात. लोकांना गृहित धरण्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. भाजपातून निवडणूक लढवायची होती तर आधीच लढवायची होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 – 25 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करुन लोकांवर निवडणूक लादावी याचा परिणाम 100 टक्के निकालात दिसेल.

मी ज्या लोकांशी बोललो, जी माहिती घेतली त्यावरुन ही निवडणूक उदयनराजे यांच्यासाठी कठिण आहे. यापूर्वी उदयनराजे सहजपणे विजयी होईल सांगू शकत होते मात्र उदयनराजेही ठामपणे सांगू शकत नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी होणार की वातावरण फिरणार असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित केला जात आहे.

उदयनराजे यांनी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली. उदयनराजे यांनी या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपकडून उभे राहत निवडणूक लढली, त्यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनी सभा घेतली होती. साताऱ्यात 1 लोकसभा तर 6 विधानसभेचे उद्या निकाल लागेल. परंतू दोन विधानसभेचा निकाल लवकर लागेल तर सहा मतदारसंघाचा निकाल विलंबाने लागेल. हा विलंब जवळपास 12 तासाचा असेल. लोकसभेनंतर उर्वरित मतदारसंघांचा निकाल स्पष्ट होईल.

Visit : Policenama.com