Loksabha : ‘ड्रिम गर्ल Vs हरयाणी गर्ल’ सामना रंगणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सपना चौधरी हे नाव भन्नाट डान्ससाठी कायम चर्चेत आहे. पण हिरयाणाची ही नृत्यांगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना चौधरी लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असून ती यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

सपना चौधरी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. सपना चौधरी उत्तर प्रदेशच्या मथुरेच्या जागेवरुन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सुत्रांकडून देण्यात आली आहे. सपना चौधरी मागच्या दीड महिन्यांपासून काँग्रेसच्या संपर्कात आहे. सपना चौधरी ज्या जागेवरून निवडणूक लढणार अशी चर्चा आहे त्या जागेवरून हेमा मालिनी मैदानात आहेत. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर सपना चौधरी निवडणुकांच्या रिंगणात उतरली तर हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी असा सामना रंगेल.

खरंतर, सपान चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि लोकसभा निवडणुका लढणार या फक्त चर्चा आहेत. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा आहेत. गेल्या २ दिवसांआधी ती काँग्रेसच्या मुख्यालयातही गेली होती.