अब्दुल सत्तारांचे बंड थंड , अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करीत अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसकडून औरंगाबाद मतदार संघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी बंड करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अखेर सत्तारांचे बंड शमल्याचे दिसून येत आहे. दरम्यान यानंतर सत्तार यांचे यापुढचे निर्णय काय असतील हे येत्या सात दिवसात कळेल असे सत्तार यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसवर नाराज सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली होती. मात्र या जागेसाठी आधिपासूनच कुणालातरी आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती समोर आली होती.

तसेच सिल्लोड विधानसभा मतदार संघात अपक्ष उभे राहिल्यास भाजपने पाठिंबा द्यावा अशी अट देखील अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. यावरून सत्तार यांचे विधानसभेसाठी सेटिंग चालू असल्याचे बोलले जात होते.