माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ‘आदर्श’ चोर : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुकी तोंडावर आली असताना राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. चौकीदार चोर आहे, पळपुटा आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. आदर्शमध्ये ज्यांनी दरोडा घातला तो चोर शब्द कसा उच्चारु शकतो याचे मला आश्चर्य़ वाटतं. विरोधकांकडून ‘चौकीदार चोर है’  हे कॅम्पेन जोरात चालवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते विनोद तावडे यांनी विरोधकाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

सत्ताधारी भाजपा चहुबाजुने घेरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज आहे. भाजपाने गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन, रणनिती यावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. ज्यांनी चंद्रपुरला आपला उमेदवार बदलावा म्हणून राजीनामा देतो असं म्हणणारा पळपुटा आहे की नाही ? असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. ज्यांनी नांदेडला उमेदवारी बदलून वहिनींना उमेदवारी देण्याचा विचार केला तो पळपुटा नाही का ? अशा व्यक्तीच्या तोंडी पळपुटा शब्द शोभत नाही, असा टोला ही तावडेंनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भुजबळ यांच्यावरही तावडेंनी निशाणा साधला. ज्यावेळी युतीचे सरकार बहुमताचे असते, जेव्हा सगळे मंत्री एकोप्याने काम करतात असे भुजबळ यांच्यावर निषाणा साधताना म्हटले.