अमित शहांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही

गांधी नगर : गुजरात वृत्तसंस्था – भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये २०१४ लोकसभा निवडणुकीला केल्लेल्या कामगिरीची पोच पावती म्हणून त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद देण्यात आले आहे. त्यांनी आता गांधी नगर मधून लोकसभेची निवडणूक लढावी अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते करत आहेत.

गांधी नगर हा लाल कृष्ण अडवाणी प्रतिनिधित्व करत असलेला लोकसभेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी २८ मार्च पासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर २३ एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. गांधी नगर येथे भाजपने आपला निरीक्षक पाठवला असता येथील कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे. भाजपा आमदार किशोर चौहान यांनी सर्व प्रथम अमित शहा यांच्या उमेदवारी बाबतची मागणी केली आहे.

अमित शहा हे सरखेज विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यांचा तो विधानसभा मतदारसंघ देखील गांधी नगर लोकसभा मतदारसंघात येतो. अमित शहा येथील प्रत्येकाला ओळखता त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ उमेदवार आमच्यासाठी कोणच असू शकत नाही असे आमदार किशोर चौहान म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे गांधी नगर लोकसभा मतदारसंघातील नारणपुरा, साणंद आणि साबरमती येथील आमदारांनीहि अमित शहा यांच्या लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us